....तर जिल्हाधिकारी हेच जबाबदार राहतील- लॉकडाऊनबाबत खासदार डॉ. सुजय विखे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:19 PM2020-07-16T12:19:10+5:302020-07-16T12:19:59+5:30
अहमदनगर : लॉकडाऊन न केल्यास उदभवणाºया परिस्थितीस जिल्हाधिकारी हेच जबाबदार राहतील, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अहमदनगर : लॉकडाऊन न केल्यास उदभवणाºया परिस्थितीस जिल्हाधिकारी हेच जबाबदार राहतील, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ. विखे म्हणाले, नगर शहरासह जिल्ह्यात सुरुवातीला दहा रुग्ण होते. ते आता हजाराच्यावर गेले आहेत. कोरोनाचा इतक्या झपाट्याने प्रसार होत आहे की परिस्थिती वेळीच नियंत्रणात न आल्यास मोठे तांडव निर्माण होऊ शकते. त्यामुळे एक डॉक्टर म्हणून माझे असे मत आहे की, जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाच ते दहा दिवसांचा लॉकडाऊन करावा. प्रशासनाने निर्णय न घेतल्यास यामुळे होणाºया मृत्यूस जिल्हाधिकारी राहुल दिवेदी हे जबाबदार राहतील.
सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेला डॉ. विखे यांच्यासोबत आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते.
....
उड्डाणपुलाचे काम आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात
नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला संरक्षण खात्याने परवानगी दिली असून हे काम कोणत्याही परिस्थितीत आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. या कामाच्या आड जे कोणी येईल? त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,असेही विखे म्हणाले.
.....
लॉकडाऊनबाबत प्रशासनाने प्रस्ताव द्यावा- आमदार जगताप
नगर शहरात यापुढे लॉकडाऊन करायचा असेल तर प्रशासनाने तसा अभ्यास करून प्रस्ताव सादर करावा. त्यावर नंतर भूमिका स्पष्ट केली जाईल, असे आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील लॉकडाऊनबाबत भूमिका स्पष्ट केली.
----
पुलाचे काम होईपर्यंत तरी विरोधात नाही
नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत तरी एकमेकांविरोधात प्रचार करणार नाही. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत संग्राम जगताप व आम्ही एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार नाही. शेवटी नगर शहरातील प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. तो पूर्ण झाला पाहिजे. यासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत, असेही विखे यांनी सांगितले.