...तर काँग्रेस मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:22 AM2021-05-21T04:22:06+5:302021-05-21T04:22:06+5:30

अहमदनगर : ऊर्जामंत्री नितीन राऊत हे वारंवार मराठा व खुल्या वर्गाबाबत बेकायदेशीर वक्तव्य करत असून, त्यांचा जाहीर माफीनामा घेण्यात ...

... then let's march on the house of the Congress minister | ...तर काँग्रेस मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू

...तर काँग्रेस मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू

अहमदनगर : ऊर्जामंत्री नितीन राऊत हे वारंवार मराठा व खुल्या वर्गाबाबत बेकायदेशीर वक्तव्य करत असून, त्यांचा जाहीर माफीनामा घेण्यात यावा, अन्यथा काँग्रेस मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासानाने ७ मे २०२१ रोजी पदोन्नतीबाबत सेवाज्येष्ठतेनुसार कार्यवाही करण्याबाबतचा निर्णय जारी केला आहे. या निर्णयाविरोधात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे बेकायदेशीर वक्तव्य करत आहेत. राऊत हे जाणीवपूर्वक मराठा समाजाविरोधात भूमिका घेत असून, राऊत यांची भूमिका काँग्रेस पक्षाची भूमिका आहे का, हे काँग्रेसने स्पष्ट करावे. तसेच काँग्रेस नेतृत्वाने राऊत यांना मराठा समाजाची माफी मागण्यास सांगावे, अन्यथा काँग्रेसच्या मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, इशारा दहातोंडे यांनी दिला आहे.

Web Title: ... then let's march on the house of the Congress minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.