...तर इतर पक्षांचा सुपडासाफ होईल, राजेंद्र नागवडे यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 10:26 AM2021-02-06T10:26:39+5:302021-02-06T10:27:15+5:30
काँग्रेस पक्षाला त्याग आणि देश सेवेची परंपरा आहे. काँग्रेस पक्षाने देश आणि आपल्या राज्याला वैभवशाली बनविले आहे. या वैभवशाली राज्याची धुरा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर दिली तर इतर पक्षांचा सुपडासाफ होईल, असे मत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले आहे.
श्रीगोंदा : काँग्रेस पक्षाला त्याग आणि देश सेवेची परंपरा आहे. काँग्रेस पक्षाने देश आणि आपल्या राज्याला वैभवशाली बनविले आहे. या वैभवशाली राज्याची धुरा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर दिली तर इतर पक्षांचा सुपडासाफ होईल, असे मत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले आहे.
श्रीगोंदा येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या कॉग्रेस बळकटीकरण कार्यक्रमात नागवडे अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
यावेळी आमदार लहू कानडे म्हणाले, जातीधर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना फडकावून भाजपाने सत्ता काबीज केली. मोदी सरकारने एलएआयसी, रेल्वे, विमानतळ विकायला काढली आहेत. त्यामुळे देशाच्या विकासाचा दर ढासळला आहे.
आमदार सुधीर तांबे म्हणाले, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने निष्ठा तत्व असलेले असलेले नेतृत्व मिळाले आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाशी आणि पक्षावर प्रेम करणाऱ्या जनतेशी बांधलकी संवाद ठेवला तर देशात सत्तांतर होऊ शकते.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, बाबासाहेब भोस, आदेश शेंडगे यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, अरुण पाचपुते, समीर बोरा, बाबासाहेब इथापे, धनसिंग भोयटे, सुरेश लोखंडे, सतिश मखरे, हेमंत नलगे, राजेश लोखंडे, सीमा गोरे, निसार बेपारी, संतोष कोंथिबीरे, सुरेखा लकडे, गयाबाई सुपेकर उपस्थित होते. सूत्रसंचलन ॲड. अशोक रोडे केले. आभार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी मानले.