...तर जिल्ह्यात ८२१ गावांत सुरू होणार शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:22+5:302021-06-30T04:14:22+5:30
(डमी) अहमदनगर : कोरोनामुक्त असलेल्या गावांत शाळा सुरू करण्याची शक्यता पडताळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सध्या ८२१ ...
(डमी)
अहमदनगर : कोरोनामुक्त असलेल्या गावांत शाळा सुरू करण्याची शक्यता पडताळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सध्या ८२१ गावे कोरोनामुक्त असून, शिक्षण विभागाची तयारी असल्यास बहुतांश गावांत पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
मागील काही महिन्यांपासून जी गावे कोरोनामुक्त आहेत, अशा गावांतील दहावी, बारावीचे वर्ग सुरू करता येतील का, याची शक्यता शिक्षण विभागाने तपासून पाहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. नगर जिल्ह्यातील १५९६ पैकी ८२१ गावे २८ जूनपर्यंतच्या अहवालानुसार कोरोनामुक्त आहेत. अशा गावांमध्ये शाळा सुरू करता येऊ शकतात. परंतु मुख्यमंत्र्यांचे निर्देश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक किंवा माध्यमिक विभागाला अद्याप मिळालेले नाहीत. ते मिळाल्यानंतर तशी चाचपणी करता येईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली.
------------------
जिल्ह्यातील एकूण शाळा - ५३७६
जि. प. शाळा - ३५७३
अनुदानित शाळा - ८८२
विनाअनुदानित शाळा - १२८
२) कोणत्या वर्गात किती विद्यार्थी?
पाचवी ७९,६०५
सहावी ७९,७१६
सातवी ७९,७७८
आठवी ८०,०६८
--------
जिल्ह्यातील एकूण गावे - १५९६
सध्या कोरोनामुक्त असलेली गावे -
तालुका एकूण गावे कोरोनामुक्त गावे
अकोले १९१ ७९
संगमनेर १७४ १०१
कोपरगाव ७९ ६०
राहाता ५९ ३२
श्रीरामपूर ५५ २९
राहुरी ९६ ५५
नेवासा १३० ३९
शेवगाव ११४ ७२
पाथर्डी १३४ ५९
जामखेड ५८ ४७
कर्जत ११८ ७१
श्रीगोंदा ११४ ४२
पारनेर १३१ ४६
नगर ११४ ८९
------------------------------
एकूण ८२१
--------------कोरोनामुक्त असलेल्या गावांत शाळा सुरू करण्याची शक्यता पडताळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सध्या ८२१ गावे कोरोनामुक्त असून, शिक्षण विभागाची तयारी असल्यास बहुतांश गावांत पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनामुक्त असलेल्या गावांत शाळा सुरू करण्याची शक्यता पडताळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सध्या ८२१ गावे कोरोनामुक्त असून, शिक्षण विभागाची तयारी असल्यास बहुतांश गावांत पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
-------------
कोरोनामुक्त असलेल्या गावांत शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी करण्याच्या शासनाच्या सूचना अद्याप प्राप्त नाहीत. मात्र अशा सूचना आल्यानंतर तशी माहिती घेऊन शाळा सुरू करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.
- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
----------
फोटो - २९स्कूल