- तर समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:19 AM2021-01-22T04:19:27+5:302021-01-22T04:19:27+5:30
शिक्षकांनी आपल्या व्यावसायिक विकासाकरिता प्रयत्न केला पाहिजे. व्यवसायासाठी प्रशिक्षणाची गरज असते. आपल्यासाठी आचारसंहितेचे पालन करण्याची गरज आहे. प्रशिक्षणासाठी व्यावसायिक ...
शिक्षकांनी आपल्या व्यावसायिक विकासाकरिता प्रयत्न केला पाहिजे. व्यवसायासाठी प्रशिक्षणाची गरज असते. आपल्यासाठी आचारसंहितेचे पालन करण्याची गरज आहे. प्रशिक्षणासाठी व्यावसायिक शपथ पालन करावी. त्यासाठी ती विकसित करण्याची गरज आहे. व्यावयायिक विकासासाठी ज्ञान, कौशल्य यांची गरज आहे. शिक्षकांनी अध्यापन विषय, पद्धती, साधने व तंत्र व विद्यार्थी यांच्यासंबंधी ज्ञान वाढविण्याची गरज आहे. ज्ञानाचे स्रोत म्हणून तंत्रज्ञान, तज्ज्ञ मार्गदर्शक, संशोधन, व्यावसायिक संघटनांमधील सहभागाने ज्ञानाची वृद्धी होते. अवतीभोवती पाहा, ज्ञानासाठी प्रयत्न करा. संभाषण, अध्यापन साधनाचा वापर, संवाद कौशल्य, समुपदेशन, नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपल्या क्षेत्रातील आदर्शाचे अनुकरण करणे महत्त्वाचे आहे. उत्तम शिक्षकांनी चरित्र, आत्मचरित्र यांचे वाचन करा, शिक्षणात काम करणाऱ्यांच्या मुलाखती भेटी घ्या. नामांकित शाळांना भेटी द्या, संस्कृती, परंपरा जोपासा असे आवाहनदेखील त्यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य सूर्यवंशी यांनी केले. सुभाष वसावे यांनी आभार मानले. पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले. महादेव वांडरे, रंजना लोहकरे, भगवान खारके, महादेव हंडाळ, रामेश्वर लोटके, गणेश मोरे, बाबुराव कांबळे यासह शिक्षक-पालक यात सहभागी झाले होते.