श्रीगोंद्याच्या सुपूत्राच्या कवितेला मिळताहेत लाखो लाइक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 01:14 PM2020-04-11T13:14:11+5:302020-04-11T13:14:43+5:30

कोरोनाच्या पार्श्वभुमीवरील कविता मुंबई पोलिस दलात आणि सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे. कोळपेंच्या कवितेला लाखात लाईक मिळाल्या आहेत.

There are millions of likes to the poetry of Shrigonda's son | श्रीगोंद्याच्या सुपूत्राच्या कवितेला मिळताहेत लाखो लाइक्स

श्रीगोंद्याच्या सुपूत्राच्या कवितेला मिळताहेत लाखो लाइक्स

श्रीगोंदा : मुंबई पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक राहुल खंडू कोळपे या श्रीगोंद्याच्या भुमिपुत्राच्या कवितेला लाखो लाइक्स मिळत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे गावातील कोळपे हे परिस्थितीवर मात करत पोलीस दलात दाखल झाले.कोरोनाच्या पार्श्वभुमीवरील कविता मुंबई पोलिस दलात आणि सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे. कोळपेंच्या कवितेला लाखात लाईक मिळाल्या आहेत.

विमानातून आलेल्यांची शिक्षा...

तू पायी चालणारांना का दिली

महासत्ता म्हणून घेणाऱ्यांची

तू किती वाताहात केली...

 

ही कोरोनाच्या पार्श्वभुमीवरील कविता मुंबई पोलिस दलात आणि सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे. कोळपेंच्या कवितेला लाखात लाईक मिळाल्या आहेत. २०१६ महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. राहुल यांना लहानपणापासून कविता करण्याचा आणि गायनाचा छंद होता.  एमपीएससी परिक्षा पास झाले पण छंद कायम आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामगिरीची या कवितेत उल्लेख आहे.

 

Web Title: There are millions of likes to the poetry of Shrigonda's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.