शनिमूर्तीवर कावडीच्या पाण्याचा जलाभिषेक नाही; शिंगणापूरचा गुढीपाडवा पहिल्यांदाच रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:54 AM2020-03-25T10:54:20+5:302020-03-25T10:56:04+5:30

शनिशिंगणापूर देवस्थानच्या चारशे वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच आजच्या (दि.२५ मार्च) गुढीपाडव्याला स्वयंभू शनिमूर्तीवर कावडीचे पाणी पडणार नाही.

There is no seawater at the shrine; Gudhpadwa of Shingnapur canceled for the first time | शनिमूर्तीवर कावडीच्या पाण्याचा जलाभिषेक नाही; शिंगणापूरचा गुढीपाडवा पहिल्यांदाच रद्द 

शनिमूर्तीवर कावडीच्या पाण्याचा जलाभिषेक नाही; शिंगणापूरचा गुढीपाडवा पहिल्यांदाच रद्द 

सोनई : शनिशिंगणापूर देवस्थानच्या चारशे वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच आजच्या (दि.२५ मार्च) गुढीपाडव्याला स्वयंभू शनिमूर्तीवर कावडीचे पाणी पडणार नाही.
दरवर्षी वाजत गाजत आणलेल्या कावडीचे जंगी स्वागत होत असते. अनेक भाविक पुरी-पिठल, गुळाचा नैवद्य शनिदेवाला अर्पण करून भाविकांना वाटप करीत आपला नवस पूर्ण करीत असत. मात्र यावर्षी कोरोनाची वाढती दहशत पाहता शनिदर्शन, पाडवा महोत्सव यात्रा, उदासी महाराज पारायण सोहळा रद्द करण्यात आला आहे.
आजचा गुढीपाडवा सोहळा रद्द केलेला आहे. महंत त्रिबंक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा होणार आहे. मात्र येथे कुणालाही प्रवेश दिली जाणार नसल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी ‘लोकमत’ ला दिली.
काशीवरून आलेल्या कावडीलाही परवानगी नाही
दरवर्षीप्रमाणे परिसरातील भाविक काशीवरून सायकलवर कावड आणत असतात. मात्र यावर्षी १४-१५ भाविक मोटारसायकलवर काशीला कावडीचे पाणी आणण्यास गेले होते. मात्र कोरोनामुळे त्यांनी कावडीने आणलेले गंगाजल टाकण्यास परवानगी देण्यात आली नाही.

Web Title: There is no seawater at the shrine; Gudhpadwa of Shingnapur canceled for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.