त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही : सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:40 AM2019-04-20T11:40:13+5:302019-04-20T11:42:20+5:30
विरोधी उमेदवार वैयक्तिक टीका करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत़ कारण त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही,
पारनेर : विरोधी उमेदवार वैयक्तिक टीका करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत़ कारण त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, अशी टीका महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांनी विरोधकांवर केली.
पारनेर तालुक्यात शुक्रवारी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते़ विधानसभेचे उपसभापती विजय औटी, सभापती राहुल झावरे, दिनेश बाबर, डॉ. भास्कर शिरोळे, सचिन वराळ, काशिनाथ दाते, रामदास रोहकले, विश्वनाथ कोरडे, सुवर्णा वाळुंज यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले. या निर्णयाचा लाभ आज देशातील शेतकऱ्यांना होत आहे़ चालूवर्षी ५० हजार मेट्रीक टन कांदा नाफेडने खरेदी केल्याने कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़ यासंदर्भात शाश्वत धोरण घेण्यासाठी संसदेत पाठपुरावा करणार असल्याचे विखे म्हणाले़ लोकसभेची निवडणूक विचारांवर आधारित आहे. शेती, पाणी आणि रोजगार या प्रश्नांवर भूमिका सुरुवातीपासूनच मांडत आहे़ त्यासाठी विचारांचा वारसा लागतो़ सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलण्याची हिंमत लागते. विरोधी उमेदवार वैयक्तिक टीका करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत़ कारण त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही. काम करण्याची संधी जनतेने त्यांना दिली होती, पण जनतेचे प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले नाही, अशी टीका विखे यांनी संग्राम जगताप यांचे नाव न घेता केली़