एमआयडीसीमधील कामगारांसाठी लसीकरण केंद्र हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:22 AM2021-05-09T04:22:10+5:302021-05-09T04:22:10+5:30

अहमदनगर : कामगार हा औद्योगिक क्षेत्रांमधील दुवा आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशाची अर्थव्यवस्था मजबूत रहावी, यासाठी ...

There should be a vaccination center for workers in MIDC | एमआयडीसीमधील कामगारांसाठी लसीकरण केंद्र हवे

एमआयडीसीमधील कामगारांसाठी लसीकरण केंद्र हवे

अहमदनगर : कामगार हा औद्योगिक क्षेत्रांमधील दुवा आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशाची अर्थव्यवस्था मजबूत रहावी, यासाठी औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्या सुरू आहेत. कामगार आपला जीव धोक्यात घालून कंपन्यांमध्ये काम करत आहेत. त्यांच्यासाठी एमआयडीसीमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी स्वराज कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका कंपनीमध्ये १०० ते १००० कामगार एकत्रित काम करत असतात. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे कामगारांना आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली आहे. काही कामगारांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. हा संसर्ग थांबविण्यासाठी कामगारांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी लक्ष घालून नगर एमआयडीसीमधील मराठा चेंबर येथील लसीकरण केंद्र सुरू करावे. लवकरात लवकर सर्व कामगारांचे लसीकरण करावे. शनिवारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे, सचिव आकाश दंडवते उपस्थित होते.

या निवेदनावर सुनील शेवाळे, आदिनाथ शिरसाठ, स्वप्निल खराडे, दीपक परभने, सुनील देवकुळे, सचिन कांडेकर, रमेश शिंदे, अभिजीत सांबारे, वसिम शेख, शशिकांत संसारे, सागर बोरुडे, जितू तळेकर, अमोल उगले, सतीश गायकवाड, सोमनाथ शिंदे आदींच्या सह्या आहेत.

-------

फोटो - ०८कामगार

स्वराज कामगार संघटनेचे योगेश गलांडे व आकाश दंडवते यांनी जिल्हा प्रशासनाला शनिवारी कामगारांच्या लसीकरणाबाबत निवेदन दिले.

Web Title: There should be a vaccination center for workers in MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.