विरोधी लाटेचा अंदाज नव्हता
By Admin | Published: May 17, 2014 11:45 PM2014-05-17T23:45:39+5:302024-03-18T16:20:42+5:30
शिर्डी : आपणही पराभवाचा अनुभव घेतलेला आहे़ पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागा़ पराभवाबद्दल कुणाला दोष देणे हे आपलं फसव समाधान करुन घेण्यासारखं आहे,
शिर्डी : आपणही पराभवाचा अनुभव घेतलेला आहे़ पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागा़ पराभवाबद्दल कुणाला दोष देणे हे आपलं फसव समाधान करुन घेण्यासारखं आहे, असे सांगत शिर्डीतील विरोधी लाटेचा अंदाज आला नाही, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी दिली. शिर्डी मतदारसंघातील धक्कादायक निकालानंतर शनिवारी दुपारी बाळासाहेब विखे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व पराभवाने खचलेल्या वाकचौरेंचे सांत्वन केले. पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागा, असा सल्ला देतानाच जिंदगी लढने के लियेही होती है, असे म्हणत विखेंनी वाकचौरेंना धीर दिला. यावेळी संस्थानचे माजी विश्वस्त विलास कोते, वाकचौरे यांच्या पत्नी सरस्वती वाकचौरे व मुलगा रोहित वाकचौरे उपस्थित होते़ निकालाच्या दिवशी सायंकाळीच कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे आदींनी वाकचौरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले. (वार्ताहर)
जनतेचा कौल मान्य
शासकीय सेवेच्या व खासदारकीच्या माध्यमातून या मतदार संघातील जनतेची गेले अनेक वर्षे सेवा केली़ या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आपल्याला मान्य असून शेवटच्या श्वासापर्यंत आपण येथील जनेतच्या सेवेत राहणार असल्याची व सक्रिय राजकारण करणार असल्याची ग्वाही मावळते खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली़ आपला शिवसेना सोडण्याचा निर्णय चुकला असे जरी जनतेला वाटत असले तरी त्या निर्णयामागे आपला व्यक्तीगत स्वार्थ नव्हता, असे त्यांनी सांगितले़