उत्साह शिगेला़़़़भाविकांची गर्दी वाढली
By Admin | Published: September 5, 2014 11:44 PM2014-09-05T23:44:13+5:302023-06-22T11:19:32+5:30
अहमदनगर : शहरासह उपनगरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला
अहमदनगर : शहरासह उपनगरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून, विविध मंडळांनी सादर केलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील भाविकांची गर्दी होत आहे़ सायंकाळी दिल्ली गेट, चौपाटी कारंजा, टिळक रोड, माणिक चौक, माळीवाडा, नवीपेठ व कापड बाजारात मोर्ठी गर्दी होत असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे़
शहरातील विविध गणेश मंडळांच्या वतीने २०० देखावे सादर करण्यात आले आहेत़
वाली पुत्र अंगदकडून रावणाचे गर्वहरण, भगवान शंकराचे तांडवनृत्य, दयाळू साईबाबा, रेड्या मुखी बोलविले वेद, शिशुपाल वध, नागदेवतांकडून शंकराची महापूजा या धार्मिक देखाव्यांसह शिवराज्यभिषेक, छत्रपती शिवराय जेजुरी गडावर, ऐतिहासिक अहमदनगर यासह ग्लोबल वार्मिंग, पाणी अडवा पाणी जिरवा, स्त्री भु्रणहत्या, महापुरुषांचे कार्य, बच्चे कंपनींसाठी मेरा नाम जोकर, छोटा भीम आदी देखावे सादर करण्यात आले आहेत़ देखावे पाहण्यासाठी रात्री दहा ते आकरा वाजेपर्यंत भाविक मोठी गर्दी करतात़ शहरासह जिल्ह्यातील भाविकही मोठ्या संख्येने देखावे पाहण्यासाठी शहरात येत आहेत़
(प्रतिनिधी)