जिल्ह्यात लावणार साडेतीस लाख वृक्ष
By Admin | Published: May 26, 2017 01:17 PM2017-05-26T13:17:07+5:302017-05-26T13:17:07+5:30
जिल्ह्यात वनविभागासह इतर शासकीय विभाग मिळून ३० लाख ४७ हजार झाडे लावणार आहेत़ या वृक्षरोपणासाठी रोपे उपलब्ध व्हावीत,
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ २६ - शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेत जिल्ह्यात वनविभागासह इतर शासकीय विभाग मिळून ३० लाख ४७ हजार झाडे लावणार आहेत़ या वृक्षरोपणासाठी रोपे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने रोपे आपल्या दारी ही योजना राबविण्यात येणार आहेत़
पहिल्या टप्प्यात २५ ते ३० जूनदरम्यान रोपांचे वाटप करण्यात येणार आहे़ १ ते ७ जुलैदरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे़ ३० लाख ४७ हजार वृक्षलागवडीमध्ये २२ लाख ३९ हजार ७७४ वृक्ष वनविभाग लावणार आहे, ५ लाख ३८ हजार जिल्हा परिषद तर २ लाख ६९ हजार वृक्ष शासनाचे इतर विभागामार्फत लावण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय वनधिकारी प्रदीप भांबरे यांनी सांगितले़