विधानसभेसाठी येणार ७ हजार मतदान यंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:52 PM2019-07-27T12:52:56+5:302019-07-27T12:56:00+5:30

जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून जिल्ह्यात तब्बल सात हजार मतदानयंत्रांची गरज भासणार आहे.

There will be 3,000 voting machines for the assembly | विधानसभेसाठी येणार ७ हजार मतदान यंत्रे

विधानसभेसाठी येणार ७ हजार मतदान यंत्रे

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून जिल्ह्यात तब्बल सात हजार मतदानयंत्रांची गरज भासणार आहे. या निवडणुकीसाठी लोकसभेची यंत्रे न वापरता तमिळनाडू येथून बेल कंपनीची नवी यंत्रे मागवण्यात येणार आहेत. ३१ जुलैपर्यंत ही यंत्रे जिल्ह्यात दाखल होणार असून १५ आॅगस्टपूर्वी या यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) करण्यात येणार आहे.
येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीची तयारी भारत निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची पाहणी करून ते निश्चित करणे, स्वीप समितीच्या बैठका आदी कार्यक्रम सुरू आहेत. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात ३ हजार ७२२ मतदान केंंद्र असून त्या ठिकाणी निवडणूक शाखेकडून मतदान यंत्रे, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ७ हजार मतदान यंत्रे (बॅलेट युनिट) ५ हजार २३० कंट्रोल युनिट व ५ हजार ४५० व्हीव्हीपॅट मागवण्यात आले आहेत. तामिळनाडूतून येणारे हे सर्व मशीन नवे कोरे असून त्यांचा लोकसभा निवडणुकीत वापर झालेला आहे. ३१ जुलैपर्यंत ही यंत्रे जिल्ह्यात दाखल होणार असून १५ आॅगस्टपूर्वी या यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) करण्यात येणार आहे.
मतदारयादी पुन:रीक्षण कार्यक्रमानुसार विशेष मोहीम जिल्ह्यात सुरू असून त्यात नवीन मतदारांची नोंदणी, नावात बदल, मयत, दुबार नावे वगळणे ही कामे होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर बीएलओंमार्फत ही मोहीम सुरू असून मतदारांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवडणूक शाखेने केले आहे.


लोकसभेची मतदान यंत्रे गोडावूनमध्येच
शिर्डी व नगर या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जी मतदार यंत्रे वापरली, ती यंत्रे या विधानसभा निवडणुकीत वापरली जाणार नाहीत. ती अद्याप एमआयडीसीमध्ये वखार महामंडळाच्या गोडावूनमध्येच सील आहेत.

Web Title: There will be 3,000 voting machines for the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.