मुळा, निळवंडेतून उद्या सकाळी जायकवाडीसाठी पाणी सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 04:09 PM2018-10-31T16:09:51+5:302018-10-31T16:10:11+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऊद्या(गुरुवार) १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे.
अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऊद्या(गुरुवार) १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे. निळवंडे धरणातून ३.८५ टीएमसी आणि मुळा धरणातून १.९० टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाचे अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
निळवंडे धरणातून सुरवातीला सहा हजार क्यूसेक ने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर ४ तासांनी दोन हजार क्यूसेक आणि पुन्हा ४ तासांनी दोन हजार क्यूसेक असा दहा हजार क्यूसेक ने विसर्ग सोडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने कुणीही आंदोलन करून विसर्गास अडथळा आणू नये, असे आवाहन जलसंपदा विभागातर्फे करण्यात आले आहे. नदीतील प्रवाह जास्त असल्याने कुणीही नदीपात्रात उतरू नये. तसेच कुणाचे विद्यूत पंप जर नदीपात्रात असतील तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावेत. कठल्याही प्रकारची मालमत्ता अथवा जिवीतहानी झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नसल्याचेही अहमदनगर पाटबंधारे विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.