विकासासाठी ते सदैव प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:20 AM2021-03-18T04:20:08+5:302021-03-18T04:20:08+5:30

- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती .............. माजी केंद्रीय मंत्री व पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीप गांधी यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. ...

They are always striving for development | विकासासाठी ते सदैव प्रयत्नशील

विकासासाठी ते सदैव प्रयत्नशील

- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

..............

माजी केंद्रीय मंत्री व पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीप गांधी यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. त्यांचे पूर्ण जीवन जनतेच्या सेवेसाठी आणि संघटनेसाठी समर्पित राहिले. ईश्वर त्यांच्या नातेवाईकांना दुःखातून उभे राहण्याची शक्ती देवो.

- अमित शहा, गृहमंत्री

................

माजी खासदार, आमचे कार्यकर्ते व सहकारी दिलीप गांधी यांच्या निधनामुळे खूप दुःख झाले. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.

- प्रकाश जावडेकर, माहिती आणि जनसंपर्क मंत्री

........

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. माझ्या सद्भावना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.

- नितीन गडकरी, रस्ते आणि महामार्ग मंत्री

................

माजी खासदार आणि मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनामुळे दुःख झाले. सक्षम प्रशासक आणि आक्रमक खासदार म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. शेतकरी व समाजातील इतर दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी काम केले. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि हितचिंतकांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो.

- राजनाथ सिंह, रक्षामंत्री

.................................

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनाची दुःखद बातमी क‌ळाली. संघटना मजबूत करण्यासाठी तसेच गरीब आणि वंचितांच्या सेवेसाठी ते कायमच कार्यरत राहिले. मी त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

- पीयूष गोयल, रेल्वेमंत्री

........................

माझा प्रिय मित्र. लोकसभेतील माजी सहकारी दिलीप गांधी यांचे निधनामुळे मला अतिशय वाईट वाटले. विविध कामात ते नेहमीच सक्रिय असत. अहमदनगरमधील जनतेचे प्रतिनिधित्व ते करायचे. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो.

- सुरेश प्रभू, माजी मंत्री

...................

माजी खासदार दिलीप गांधी यांचे असे अकस्मात निघून जाणे अतिशय वेदनादायी आणि दुःखद आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाच्या संघटनात्मक बांधणीत अगदी महाविद्यालयीन काळापासून त्यांचे योगदान, विविध सामाजिक कार्य आणि एक उमदा लोकप्रतिनिधी म्हणून केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. दिलीप गांधी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्त परिवार आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी मी प्रार्थना करतो.

- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

Web Title: They are always striving for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.