शेतक-यांवर ते गोळी चालवतात-स्मृती इराणी; श्रीगोंद्यात पाचपुतेंच्या प्रचारार्थ सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:28 PM2019-10-16T12:28:17+5:302019-10-16T12:28:50+5:30
कॉँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या सत्तेच्या काळात राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारला. पुण्यातील शेतक-यांना पाणी देण्याऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर लाठीमार, गोळीबार करण्याचे आदेश दिले. शेतक-यांना गोळ्या घालणा-यांना मतदान करणार का? असा सवाल केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केला.
श्रीगोंदा : कॉँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या सत्तेच्या काळात राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारला. पुण्यातील शेतक-यांना पाणी देण्याऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर लाठीमार, गोळीबार करण्याचे आदेश दिले. शेतक-यांना गोळ्या घालणा-यांना मतदान करणार का? असा सवाल केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केला.
श्रीगोंदा येथे भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खासदार डॉ. सुजय विखे होते. इराणी म्हणाल्या, फडणवीस सरकारने शेतकºयांची कर्जमाफी केली. मराठा समाजाला आरक्षण दिले. राज्यात पुन्हा हेच सरकार येणार असल्याने श्रीगोंद्याने पाचपुते यांना विजयी करावे. पाचपुते म्हणाले, घनश्याम शेलार हे जिंकण्यासाठी उभे राहिलेले नाहीत. त्यांच्याविषयी आपण काय बोलणार. शेलार सर्व पक्ष फिरले, असे सुरेश धस म्हणाले.माजी खासदार दिलीप गांधी, राजेंद्र नागवडे, भगवानराव पाचपुते, अनिल
ठवाळ, जिजाबापू शिंदे, बाळासाहेब नाहाटा, विलास भोसले, नंदकुमार ताडे, बाळासाहेब गिरमकर, अॅड. सुभाष डांगे, दादासाहेब जगताप, दादासाहेब ढवाण यांची भाषणे झाली.
काहींचे राजकारण तडजोडीचे - सुजय विखे
श्रीगोंद्यातील काही पुढारी सेटलमेंट, ब्लॅकमेलचे राजकारण करतात. त्यामुळे येथे जोपर्यंत अर्थकारण व राजकारण वेगळे होत नाही. तोपर्यंत श्रीगोंद्याचा विकास होणार नाही. विकासासाठीच नागवडे-पाचपुते एकत्र आले आहेत, असे खासदार डॉ. विखे यांनी सांगितले.