तिखट -मीठ खाऊन दिवस काढू...पण आधी कोरोना गेला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 01:14 PM2020-04-12T13:14:33+5:302020-04-12T13:17:09+5:30

दहिगाव बोलका : गावात जे काही विळे, खुरपे विकतो त्यातून आलेल्या पैश्यातून तेल, तिखट-मीठ घेऊन दिवस काढतोय. कामाच्या बदल्यात लोकही किमतीपेक्षा जास्तच गहू,तांदूळ देताहेत. लोकही मदतीचे हात पुढे करतात. नाहीत तिखट-मीठ खाल्ले तरी तरीही कधी एकदा हा रोग जातोय असं झालयं"सुभाष पडूळकर काकुळतीने सांगत होता.

 Thick-salt salt will take days off ... but first Corona should go | तिखट -मीठ खाऊन दिवस काढू...पण आधी कोरोना गेला पाहिजे

तिखट -मीठ खाऊन दिवस काढू...पण आधी कोरोना गेला पाहिजे

दिनेश जोशी
दहिगाव बोलका : गावात जे काही विळे, खुरपे विकतो त्यातून आलेल्या पैश्यातून तेल, तिखट-मीठ घेऊन दिवस काढतोय. कामाच्या बदल्यात लोकही किमतीपेक्षा जास्तच गहू,तांदूळ देताहेत. लोकही मदतीचे हात पुढे करतात. नाहीत तिखट-मीठ खाल्ले तरी तरीही कधी एकदा हा रोग जातोय असं झालयं"सुभाष पडूळकर काकुळतीने सांगत होता.
गेल्या एक महिन्यापासून लाडगाव (ता.वैजापूर) येथील सुभाष भिमराव पडूळकर येथील महादेव मंदीराजवळ थांबला आहे. स्वत: जवळील एक मालवाहू रिक्षातून तो कुटूंब काबिला घेऊन हे गाव, ते गाव करीत येथे आला आहे. घिसाडी हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय. हेच त्याचे उत्पन्नाचे साधन. एक महिन्यापूर्वी तो येथे आला. सुरवातीचे काही दिवस धंदाही व्यवस्थित सुरू होता. विशेषत: सोंगणीचा हंगाम सुरू असल्याने विळे शेवटन्याचे काम तसेच नवीन विळे तयार करण्याचे काम सुरू होते. हे व्यावसायिक एका गावात धंद्यात थोडी मंदी आली की लगेच पुढच्या गावाची वाट धरतात. सुभाषलाही पुढील गावात जायचे होते. पण संचारबंदी सुरू झाल्याने त्याला पुढील गावात जाता येईना. त्याला ग्रामपंचायतीनेही गाव सोडण्यास मनाई केली. त्यामुळे तो सध्या येथेच महादेव मंदीराच्या परीसरात मुक्कामी आहे. त्याचे कुटुंबात पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे. कोणी काही आणून दिलेले नाही परंतू विक्री करायला गेलो की लोक किमतीपेक्षा थोडे जास्तच देतात. त्यामुळे बरे चालू आहे. परंतू हे संकट लवकर जावे, असे मनापासून वाटते.अशी प्रार्थना त्याने समोरील महादेव मंदीराकडे पाहून केली.

Web Title:  Thick-salt salt will take days off ... but first Corona should go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.