नर्सरीचे ऑफीस फोडून चोरट्यांनी बी बियाणे लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 10:30 AM2020-11-11T10:30:24+5:302020-11-11T10:32:24+5:30

घारगाव : अष्टविनायक हायटेक नर्सरीचे ऑफीस फोडून चोरट्यांनी विविध जातीचे बी बियाणे व रोख रक्कम असा एकूण एक लाख आकरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

Thieves broke into the nursery office and stole seeds | नर्सरीचे ऑफीस फोडून चोरट्यांनी बी बियाणे लांबविले

नर्सरीचे ऑफीस फोडून चोरट्यांनी बी बियाणे लांबविले

नर्सरीचे ऑफीस फोडून चोरट्यांनी बी बियाणे लांबविले
 

 घारगाव येथील घटना : चोरटे सिसिटीव्हीत कैद 

घारगाव :  अष्टविनायक हायटेक नर्सरीचे ऑफीस फोडून चोरट्यांनी विविध जातीचे बी बियाणे  व रोख रक्कम असा एकूण एक लाख आकरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे नाशिक पुणे महामार्गालगत
 मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. चोरटे सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 
          याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप तान्हाजी लेंडे हे (आळेफाटा ता.जुन्नर जि.पुणे) येथील रहिवाशी असून त्यांची घारगाव शिवारात अष्टविनायक हायटेक नर्सरी आहे. त्यांनी विक्रीसाठी झेंडू, टोमॅटो, कोबी,वांगे,मिरची,शेवगा, आदी बी बियाने विक्रीसाठी ठेवली होते. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी नर्सरीत प्रवेश करत ऑफीसचे शटर उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील बी बियाने, रोख रक्कम असा एकूण एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला.  सकाळी लेंडे हे नर्सरीत आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सिसिटीव्ही कॅमेरे चेक केले असता चोरट्यांनी शटर उचकटून दोघे जणांनी आत मध्ये प्रवेश केला तर काही जण बाहेर थांबल्याचे त्यांना त्यात दिसले.
       याप्रकरणी संदीप लेंडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकाॅन्सटेबल आदिनाथ गांधले हे करत आहे.

Web Title: Thieves broke into the nursery office and stole seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.