संगमनेर तालुक्यातील बोटामधील आठ दुकानांवर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:41 AM2018-08-12T10:41:11+5:302018-08-12T10:41:27+5:30
पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा गावातील आठ दुकाने चोरट्यांनी फोडली. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
संगमनेर : पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा गावातील आठ दुकाने चोरट्यांनी फोडली. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
आशीर्वाद कृषी सेवा केंद्र, वर्धमान किराणा स्टोअर्स, श्रीराम कलेकशन, नम्रता मेडिकल, श्रीराम इरिगेटर्स अँड हार्डवेअर, सरोज गिफ्ट शॉपी, संदीप किराणा स्टोअर्स, साईकृपा कृषी सेवा केंद्र या आठ ठिकाणी दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. मात्र किती मुद्देमाल चोरून नेला हे अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप निघोट, पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरु केला आहे.