'एलसीबी'चे कर्मचारी असल्याचे सांगत चोरट्यांनी भरदिवसा उद्योजकाला लुटले,शहरात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 03:44 PM2020-06-21T15:44:41+5:302020-06-21T15:45:01+5:30
अहमदनगर: 'एलसीबी'चे कर्मचारी असल्याचे सांगत नगर शहरात भरदिवसा दोघा चोरट्यांनी उद्योजकाला मारहाण करत त्याच्याकडील 1 लाख 20 हजार हजार 200 रुपये हिसकावून नेले. शनिवारी (दि.20) दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास शहरातील गंगाउद्यानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत ही घटना घडली. याप्रकरणी अमित ज्ञानेश्वर सुंकी (वय 31 रा. श्रमिक नगर अहमदनगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सुंकी यांची नगर एमआयडीसी येथे बालाजी इंटरप्राईजेस नावाची कंपनी आहे. ते शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मोटरसायकलवरून गंगा उद्यान परिसरातून जात होते. याचवेळी युनिकॉर्न या मोटरसायकलवरून दोन जण आले. त्यांच्या मोटारसायकलला फायबरचे दांडके लावलेले होते. त्यांनी सुंकी यांची गाडी थांबविली व आम्ही एलसीबीचे कर्मचारी आहेत असे सांगितले.
त्यानंतर सुंकी यांना त्यांची मोटरसायकल गंगाउद्यानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत घेण्यास सांगितली. हे दोघे चोरटे पोलीस असल्याचा समज झाल्याने सुंकी यांनी मोटारसायकल मैदानाकडे नेली. मैदानात गेल्यानंतर या दोघांनी सुंकी यांना हाताने व लाथाने मारून त्यांच्या खिशातील पैसे हिसकावून नेले. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळंके हे करत आहेत.
----------------------
तोफखाना पोलिसांकडून चौफेर तपास
लुटमारीची घटना घडल्यानंतर अमित सुंकी यांनी शनिवारी रात्री आठ वाजता तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तोफखाना पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास सुरू केला असून चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केले आहेत. घटना घडली त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.