दुष्काळात तेरावा : नगर तालुक्याची तहान भागविणारी बु-हाणनगर योजना संकटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 04:26 PM2018-10-27T16:26:04+5:302018-10-27T16:26:07+5:30

जवळपास निम्म्या नगर तालुक्याची तहान भागविणा-या आणि तालुक्यासाठी जलसंजीवनी ठरलेल्या बु-हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ऐन दुष्काळजन्य स्थितीत संकटात सापडली आहे.

Thiravah in the famine: Burhannagar plan to thwart Nagar taluka in trouble! | दुष्काळात तेरावा : नगर तालुक्याची तहान भागविणारी बु-हाणनगर योजना संकटात !

दुष्काळात तेरावा : नगर तालुक्याची तहान भागविणारी बु-हाणनगर योजना संकटात !

ठळक मुद्देपाणी पट्टीची साडे तीन कोटी आणि वीजबिलाची साडे चौदा कोटीची थकबाकी

योगेश गुंड
केडगाव : जवळपास निम्म्या नगर तालुक्याची तहान भागविणा-या आणि तालुक्यासाठी जलसंजीवनी ठरलेल्या बु-हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ऐन दुष्काळजन्य स्थितीत संकटात सापडली आहे. नियोजनशून्य कारभाराचा फटका योजनेत समाविष्ट असणा-या ३८ गावांना बसत आहे. योजनेतून पाणी घेणा-या गावांकडे साडे तीन कोटींची पाणीपट्टी थकली असून योजनेकडे वीजबिलाची साडे चौदा कोटींची थकबाकी थकली आहे. यातून मार्ग निघाला नाहीतर ऐन दुष्काळात योजना बंद पडण्याची वेळ येणार आहे.

टँंकर मुक्त नगर तालुक्यासाठी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नाने ४४ गावांची बु-हाणनगर व १७ गावांची घोसपुरी पाणी योजना कार्यान्वित झाली. या दोन्ही योजना दुष्काळी नगर तालुक्यासाठी वरदान ठरल्या. यामुळे नगर तालुक्यातील टेंकरची संख्या निम्म्याने घटली. गेल्या १२ वर्षांपासून या योजना सुरु असून दुष्काळात या योजनांनी तालुक्याची तहान भागविली आहे. घोसपुरी पाणी योजनेला विसापूर तलावातून पाणी आणले जाते. या योजनेची थकबाकी ४३ लाख रुपये इतकी होती. मात्र या योजनेने सरकारी योजनेत सहभाग घेऊन थकबाकीचे १० लाख भरले. उर्वरित १० लाख शासन भरणार असून बाकीचे २३ लाख रुपये माफ होणार आहेत. यामुळे घोसपुरी पाणी योजनेचे आर्थिक संकट तूर्त टळले असले तरी पाण्याचे कमी होणारे स्रोत आणि वारंवार येणा-या अडचणी यामुळे घोसपुरीचे संकट केव्हाही मानगुटीवर बसू शकते. या योजनेची समिती असून त्यामार्फत योजनेतील अडचणी सोडवल्या जात आहेत. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले या समितीचे अध्यक्ष आहेत.

जवळपास निम्म्या तालुक्याची तहान भागवणार्या बुर्हाणनगर पाणी योजना मात्र आर्थिक संकटात सापडली आहे. हि योजना जिल्हा परिषदकडे हस्तांतरित झालेली असून नियोजनाआभावी योजनेची साडेसाती सुरूच आहे. योजनेत सहभागी असणा-या गावांकडे पाणी पट्टीच्या वसुलीपोटी ३ कोटी ४७ लाख २ हजार ४४६ रुपये थकले आहेत. वारंवार मागणी करूनही हि गावे थकबाकी भरत नसल्याने हि योजना चालवायची कसी असा प्रश्न जिल्हा परिषदच्या प्रशासनला पडला आहे. थकबाकीचा आकडा वाढत असल्याने योजनेवर खर्च कशातून करायचा याची अडचण निर्माण झाली आहे. या योजनकडे वीजबिलाची साडे चौदा कोटींची थकबाकी झाली असून हि थकबाकी भरली नाहीतर योजनेची वीज केव्हाही तोडली जाऊ शकते असे झाल्यास या गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
योजनेसाठी रोज ८ ते ९ तास पंपिंग करणे आवश्यक असताना रोजचे २० तास पंपिंग केले जाते. आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. योजनेतून अनेक जन चोरून पाणी वापरत आहेत. काही शेतक-यांनी या योजनेची जलवाहिनी मधेच ताडून पाणी शेतीकडे वळवले आहे. परिणामी काहीना पाणी मिळते तर काहीना नियमित पाणी मिळत नाही.

नागरदेवळे गावात दीड कोटीची थकबाकी
बु-हाणनगर पाणी योजनेपोटी सहभागी गावांकडे साडे तीन कोटींची थकबाकी असून एकट्या नागरदेवळे गावाकडे १ कोटी ६० लाखांची थकबाकी आहे. तर बु-हाणनगर गावाकडे १५ लाख ८२ हजार, वडारवडी कडे १७ लाख ७४ हजार, कापूरवाडीकडे १८ लाख, केकती-शहापूरकडे २९ लाख अशी मोठ्या गावांकडे थकबाकी आहे. यामुळे हि योजना आर्थिक संकटात सापडली आहे.

दुष्काळ आढावा बैठकीस एकच आमदार
पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन भवनात तालुक्याची टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यास तीन आमदारांचा तालुका असताना केवळ आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित राहिले. उर्वरित दोन आमदारांनी याकडे पाठ फिरवली. यामुळे या योजनेच्या थकबाकीचे कोणतेच नियोजन झाले नाही.

देहेरे जिल्हा परिषद गटातील ११ गावे बु-हाणनगर योजनेची पाणी पट्टी नियमित भरतात.म् ाात्र जी गावे नियमित बिले भरत नाहीत त्यांच्यामुळे इतर गावांना नाहक पाणी टंचाई सोसावी लागते. त्यामुळे जी गावे पाणी भरतात त्यांचे पाणी मीटर स्वतंत्र बसवावे.- प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्य

अनेक संकटावर मात करत आम्ही घोसपुरी योजना चालवत आहोत. ती यशस्वी करून दाखवली.आता आम्ही बु-हाणनगर योजनेकडे लक्ष घालणार आहोत. - संदेश कार्ले, अध्यक्ष, घोसपुरी पाणी योजना समिती

Web Title: Thiravah in the famine: Burhannagar plan to thwart Nagar taluka in trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.