अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा रूग्ण आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 04:52 PM2020-03-24T16:52:32+5:302020-03-24T16:53:28+5:30
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण मंगळवारी (दि. २४ मार्च) आढळून आला. त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविण्यात आला होता. त्याचा मंगळवारी अहवाल आला. त्यात तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे.
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण मंगळवारी (दि. २४ मार्च) आढळून आला. त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविण्यात आला होता. त्याचा मंगळवारी अहवाल आला. त्यात तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. हा रुग्ण परदेशातून आलेला नाही किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातही आलेला नव्हता.
सदरचा रुग्णाला सर्दी, खोकला येत असल्याने तो स्वत:हून रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. यावेळी त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. तो कोणाच्याही संपर्कात आलेला नव्हता. त्याला लगेच नगर येथील एका रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. सदरचा रुग्ण हा एका शहरातला असून तो विदेशातून किंवा अन्य कोणत्या गावातून आलेला नव्हता. हा वेगळा स्वतंत्र रुग्ण आढळला असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता लोकांनी मोठी खबरदारी घेण्याची गरज आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील २०८ जण संशयित असल्याचे आढळून आले होते. त्यापैकी जवळपास १९७ जणांना घरी पाठविण्यात आलेले आहे. याशिवाय दोन जणांचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी एक पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच चिंता व्यक्त केली जात आहे.