कोपरगावात तिस-या दिवशीही मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:01 PM2018-08-11T13:01:02+5:302018-08-11T13:01:17+5:30
मराठा आरक्षणासाठी शहरासह तालुक्यात गुरुवारपासून (९ आॅगस्ट ) बंद पाळत सुरवात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन आज तिस-या दिवशीही सुरु आहे. आज भजन कीर्तन करून आंदोलन सुरू आहे.
कोपरगाव : मराठा आरक्षणासाठी शहरासह तालुक्यात गुरुवारपासून (९ आॅगस्ट ) बंद पाळत सुरवात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन आज तिस-या दिवशीही सुरु आहे. आज भजन कीर्तन करून आंदोलन सुरू आहे.
कोपरगाव तालुक्यातील सडे येथील श्रीराम भजनी मंडळ व सकल मराठा समाजाच्या बांधवानी शनिवारी कोपरगाव तहसील कार्यालयासमोरील बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी भजन कीर्तन केले. जोपर्यत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. या आंदोलनासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज बांधव दररोज या ठिकाणी येऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिली. भारूड तसेच जनजागरणाचे कार्यक्रम करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर साखळी पद्धतीनुसार ठिया आंदोलनप्रसंगी अनिल गायकवाड, अमित आढाव, दिनेश पवार, दादा आवारे, विनायक भगत, अमोल लोखंडे, बाळासाहेब शिंदे, साई नरोडे, भुषण पाटणकर, दादा आवारे, प्रतीक कावळे, कुलदीप पवार, सागर नरोडे, भूषण मुळीक, निखिल डांगे, अक्षय आंग्रे, बालाजी गोर्डे, अजित कोताडे, अमोल थोरात,अमोल लोखंडे मराठा समाज बांधव उपस्थित होते .