कुकडीच्या सिंचन चा-यांच्या कामासाठी तेराशे कोटींचा निधी : राम शिंदे यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 04:27 PM2017-11-21T16:27:10+5:302017-11-21T16:33:05+5:30

३५ वर्षापासून रखडलेल्या कुकडीच्या सिंचन चा-यांच्या कामाचा प्रश्न सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे मार्गी लागणार आहे. त्यासाठी तेराशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दिली.

Thirty crores of funds for the work of irrigation of Kukadi: Ram Shinde's announcement | कुकडीच्या सिंचन चा-यांच्या कामासाठी तेराशे कोटींचा निधी : राम शिंदे यांची घोषणा

कुकडीच्या सिंचन चा-यांच्या कामासाठी तेराशे कोटींचा निधी : राम शिंदे यांची घोषणा

ठळक मुद्दे कर्जत-जामखेडमधील बंधा-यासाठी ४ कोटी ८२ लाख निधीची कामे झाली आहेत.यंदा जलयुक्त शिवाराची १ कोटी ७० लाख निधींची कामे प्रस्तावित आहेत.कुकडीच्या सिंचन चा-यांसाठी तेराशे कोटी रूपयांचा निधी

राशीन : ३५ वर्षापासून रखडलेल्या कुकडीच्या सिंचन चा-यांच्या कामाचा प्रश्न सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे मार्गी लागणार आहे. त्यासाठी तेराशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दिली.
करमनवाडी (ता.कर्जत) येथील नांदणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याच्या जलपूजनप्रसंगी ते बोलत होते. मंत्री शिंदे म्हणाले, यंदा जलयुक्त शिवाराची १ कोटी ७० लाख निधींची कामे प्रस्तावित आहेत. कर्जत-जामखेडमधील बंधा-यासाठी ४ कोटी ८२ लाख निधीची कामे झाली आहेत. पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे सुरू असून त्यासाठी दहा कोटींचा निधी आला आहे. शेतक-यांनी पाणी वापराबाबतचे निकष ठेवावे व शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे तसेच पाणी वापर संस्था तयार केल्या पाहिजेत. या बंधा-याचा परिसरातील चार गावांना फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी नामदेव राऊत, कांतीलाल घोडके, अल्लाउद्दीन काझी, राजेंद्र देशमुख यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास जि. प. सदस्य कांतीलाल घोडके, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी, युवक नेते राजेंद्र देशमुख, पांडुरंग भंडारे, अंकुश बनसोडे, बापूराव धोंडे, ज्ञानदेव लष्कर, अमित मोरे, ज्ञानदेव सायकर, कुंडलिक सायकर, पवन जांभळकर, राजेंद्र घोडके, राजेंद्र सुपेकर, मालोजी भिताडे, सुनील काळे, प्रकाश शिंदे, किसन खराडे, सोमनाथ पाचारणे उपस्थित होते.
ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे राशीन ते मोहितेवस्ती, चौकीचा लिंब ते करमनवाडी अंतर्गत रस्त्यांची मागणी केली. प्रास्ताविक डॉ.विलास राऊत यांनी केले. अ‍ॅड. हरिचंद्र राऊत यांनी सूत्रसंचालन केले. बापूराव धोंडे यांनी आभार मानले.
--------------------------------------------------------------------------------------------
(फोटो-२१ राशीन शिंदे १)

Web Title: Thirty crores of funds for the work of irrigation of Kukadi: Ram Shinde's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.