दत्तक विधानाबाबत बेकायदेशीर जाहिराती करणाऱ्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:27+5:302021-06-17T04:15:27+5:30
अहमदनगर : कोरोनामुळे आई-वडील व पालक मृत पावलेल्या बालकांना दत्तक देण्याच्या बाबत सोशल मीडिया व इतर प्रसारमाध्यमांवर अवैधरीत्या जाहिराती ...
अहमदनगर : कोरोनामुळे आई-वडील व पालक मृत पावलेल्या बालकांना दत्तक देण्याच्या बाबत सोशल मीडिया व इतर प्रसारमाध्यमांवर अवैधरीत्या जाहिराती करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा, असे आदेश महिला व बालअपराध प्रतिबंध विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.
बालकांना दत्तक देण्याबाबत अवैधरीत्या जाहिरात करणे हे बाल हक्क संरक्षण कायदा २०१५ च्या विरोधी आहे. त्यामुळे बालकांबाबत अशी दिशाभूल करणाऱ्यांची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागास कळवावी, असे आवाहन संबंधित शाखेच्या प्रभारी अधिकारी यांनी केले आहे. कोविड केंद्रामध्ये असलेल्या महिलांचे संरक्षण, तसेच कोरोनाने आई-वडिलांचे निधन झाले आहे. अशा बालकांच्या हक्कांचे संरक्षण व अशा बालकांना बेकायदेशीर प्रकारे दत्तक देण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने कार्यवाहीच्या दृष्टीने पोलिसांच्यावतीने हे आवाहन करण्यात आले आहे.