अहमदनगरमधील हजारो गुंतवणूकदारांना ३ कोटींना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:32 AM2018-05-30T11:32:12+5:302018-05-30T11:32:31+5:30

बीएनपी आणि मैत्रेय या कंपन्यांनी जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचे उदाहरण ताजे असतानाच रॉयल टिष्ट्वंकल स्टार क्लब (मुंबई) या कंपनीनेही नगरकरांना ३ कोटी १० लाख रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

Thousands of investors in Ahmednagar have to pay Rs 3 crore | अहमदनगरमधील हजारो गुंतवणूकदारांना ३ कोटींना गंडा

अहमदनगरमधील हजारो गुंतवणूकदारांना ३ कोटींना गंडा

अहमदनगर : बीएनपी आणि मैत्रेय या कंपन्यांनी जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचे उदाहरण ताजे असतानाच रॉयल टिष्ट्वंकल स्टार क्लब (मुंबई) या कंपनीनेही नगरकरांना ३ कोटी १० लाख रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कंपनीचे कर्मचारी प्रबोध वसंत शिंदीकर (वय ४५ रा़ संगमनेर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी कंपनीचे अध्यक्ष ओमप्रकाश वसंतकुमार गोयंका, एन. एस. कोटनीस, प्रोडक्शन डायरेक्टर व्ही. नटराजन, व्यवस्थापन डायरेक्टर प्रकाश उत्तेकर, मिराह ग्रुपचे एम. डी. गौरव गोयंका, उमेश वर्तक व जितू विटलानी (सर्व रा़मुंबई) यांच्याविरोधात फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. रॉयल टिष्ट्वंकल स्टार क्लब लिमिटेड व तिची संयुक्त कंपनी सिट्रस चेक इन सीमीटेड कंपनीचे संगमनेर येथे नगर रोडवर डॉ. सावंत हॉस्पिटलमसोर तर नगर येथे नगर-पुणे रोडवरील अक्षदा गार्डन येथे कार्यालय आहे. या कंपनीने जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून एजंटामार्फत कोट्यवधी रूपयांच्या ठेवी जमा करून घेतल्या़ . शहरासह ग्रामीण भागातील अनेकांनी या कंपनीत पैसे गुंतविले. ठेवीची मुदत संपूनही पैसे मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. अखेर याच कंपनीत काम करणाऱ्या शिंदीकर यांनी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. टिष्ट्वंकल स्टार क्लब कंपनीविरोधात पहिल्यांदाच गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे या पुढील तपास करत आहेत.

विविध योजनांत गुंतवणूक
रॉयल टिष्ट्वंकल स्टार कंपनीने गुंतवणूकदारांसाठी विविध योजना सुरू केल्या होत्या. यामध्ये मुदत ठेव, विमा, लहान मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक आदींचा समावेश होता. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने जिल्हाभरात कमिशनबेसवर एजंटांची नेमणूक केली होती. यामध्ये हजारो जणांनी पैसे गुंतविले. गुंतविलेले पैसे परत मिळण्याची मुदत संपूनही कंपनीकडून पैसे मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी आता एजंटांच्यामागे तगादा लावला आहे.

Web Title: Thousands of investors in Ahmednagar have to pay Rs 3 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.