जंगलास आग लागून हजारो झाडे बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 04:10 PM2021-01-29T16:10:23+5:302021-01-29T16:10:57+5:30

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावानजीक चिंचोली रस्त्याच्याकडेला असलेल्या जंगलास गुरुवारी ( दि. २८ ) दुपारी सुमारास अचानक आग लागली. या आगीत हजारो वृक्षरोपे जळून बेचिराख झाली.

Thousands of trees were set on fire | जंगलास आग लागून हजारो झाडे बेचिराख

जंगलास आग लागून हजारो झाडे बेचिराख

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावानजीक चिंचोली रस्त्याच्याकडेला असलेल्या जंगलास गुरुवारी ( दि. २८ ) दुपारी सुमारास अचानक आग लागली. या आगीत हजारो वृक्षरोपे जळून बेचिराख झाली. सुमारे पाच एकर क्षेत्रातील नवीन लागवड केलेले जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबने पाणी मारून आग विझविली मात्र तोपर्यंत हजारो वृक्ष जळून बेचिराख झाले होते.

तळेगाव दिघे गावाच्या पश्चिमेला गायरान क्षेत्रात सुमारे पाच एकरहून अधिक क्षेत्रात वनविभागामार्फत विविध वृक्ष रोपांची लागवड करण्यात आलेली होती. यंदा पाऊस चांगला झाल्याने वृक्षरोपे बहरू लागली होती.

दरम्यान गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जंगलास अचानक आग लागली. वाळलेल्या गवतामुळे आगीने जोरात पेट घेतला. थोड्याच वेळात आगीने जंगलाचा मोठा परिसर व्यापला. याबाबत माहिती मिळताच सरपंच बाबासाहेब कांदळकर, युवक कार्यकर्ते मतीन शेख, अमोल दिघे, अनिल दिघे सहित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. जंगलास आग कशामुळे लागली याचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही.

Web Title: Thousands of trees were set on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.