पूनावाला यांना दिलेल्या धमक्या तपासाचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:20 AM2021-05-10T04:20:27+5:302021-05-10T04:20:27+5:30

खासदार सदाशिव लोखंडे, संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन चौगुले उपस्थित ...

Threats to Poonawala subject to investigation | पूनावाला यांना दिलेल्या धमक्या तपासाचा विषय

पूनावाला यांना दिलेल्या धमक्या तपासाचा विषय

खासदार सदाशिव लोखंडे, संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन चौगुले उपस्थित होते.

थोरात म्हणाले, केंद्र सरकारने अनेक बाबतीत राज्यावर अन्याय केला आहे. विदेशातून जी मदत येते आहे़ त्यामध्ये महाराष्ट्राला वाटा मिळत नाही. सध्या लसीकरण महत्त्वाचे आहे, आपण त्यासाठी तयार असूनही आपल्याला पुरेशा लस उपलब्ध होत नाहीत. अनेक गोष्टीत केंद्र सरकार आपल्याकडे कानाडोळा करत आहे. राज्य सरकारचा प्रयत्न सुरू असून प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत. ऑक्सिजन, आयसीयूची संख्या वाढवली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून व खासदार लोखंडे यांच्या पाठपुराव्यामुळे शिर्डीत साडेचार हजार बेडचे कोविड सेंटर शिर्डीत उभारले जाणार आहे. या सेंटरमध्ये लहान मुलांवरही उपचाराची सुविधा असेल. मुंबई मॉडेलचे सुप्रीम कोर्टानेही कौतुक केले. याच धर्तीवर शिर्डीतील सेंटरसाठी स्टाफ उपलब्ध करू, असे थोरात म्हणाले. जिल्ह्यात पालकमंत्री, प्रशासन उत्तम काम करत असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

Web Title: Threats to Poonawala subject to investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.