शिवसैनिक हत्याकांडप्रकरणी आठ जणांवर दोषारोप, तीनही आमदारांना दिलासा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 05:18 PM2018-07-06T17:18:38+5:302018-07-06T21:12:10+5:30
टनेला आज ९० दिवस पूर्ण झाल्याने सीआयडीने गुन्ह्याचे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
अहमदनगर : केडगाव हत्याकांडात अटक केलेल्या दहापैकी भानुदास एकनाथ कोतकर, संदीप रायचंद गुंजाळ, विशाल बाळासाहेब कोतकर, रविंद्र रमेश खोल्लम, बाळासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप उर्फ जॉॅन्टी बाळासाहेब गि-हे, महावीर उर्फ पप्पू रमेश मोकळे यांच्याविरोधात आज जिल्हा न्यायालयात दोषारोपफत्र दाखल करण्यात आले. तर आमदार संग्राम अरुण जगताप व बाळासाहेब एकनाथ कोतकर यांच्यावरील गुन्हा तपासावर ठेवण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल असलेल्या उर्वरित २४ जणांविरोधात पुरावे मिळाल्यानंतर सीआयडी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. तीन आमदारांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी त्यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. घटनेला आज ९० दिवस पूर्ण झाल्याने सीआयडीने गुन्ह्याचे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने गोळ्या घालून हत्या केली़ या घटनेनंतर गुंजाळ स्वत:हून पोलिसांत हजर झाला़ मयत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० व सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. या घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती़ विशेष पथकाने फिर्यादीत नाव असलेले आठ, तर इतर दोन अशा दहा जणांना अटक केली़ हत्याकांडातील मयतांच्या कुटुंबीयांनी मात्र तपासी यंत्रणेवर आक्षेप घेतल्याने हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात आला़ सीआयडीचे (पुणे) पोलीस उपाधीक्षक अरुणकुमार सपकाळे हे हत्याकांडाचा तपास करत आहेत़
यांच्यावर दाखल होता गुन्हा
आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर, संदीप कोतकर, विशाल कोतकर, औदुंबर कोतकर, बाळासाहेब कोतकर, रवी खोल्लम, अशोक कराळे, नवनाथ मराळे, मोसीन शेख, विजय कराळे, रमेश कोतकर, शरद जाधव, संदीप गिºहे, दादा येणारे, विनोद लगड, मनोज कराळे, भानुदास ऊर्फ बी. एम. कोतकर, मयूर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्नील पवार, संकेत लगड, बाबासाहेब कोतकर, राजू गांगड, आप्पा दिघे, बाबूराव कराळे, ज्ञानेश्वर कोतकर