साडेतीन फुटाचे बाजारीचं कणीस, शेतकऱ्याने फुलवली तुर्की बाजरीची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 02:44 PM2023-09-13T14:44:15+5:302023-09-13T14:44:41+5:30
अतिशय कमी पाण्यामध्ये हे बाजरीचे पीक येत असल्याचा त्यांचं म्हणणं आहे.
संगमनेर तालुक्यातील देवकवठे गावचे प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय बाळकृष्ण गाजरे यांनी आपल्या शेतामध्ये राजस्थानहून आणलेल्या तुर्की जातीच्या बाजरी बियाण्याची लागवड केली केली आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतानाही प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय गाजरे यांनी आपल्या कल्पकतेला वाव देत स्वतःच्या ३० गुंठे शेतात १ किलो तुर्की जातीच्या बाजरी बियाणाची पेरणी करून ३० गुंठे शेती शिवार फुलवला आहे.साधारणपणे या ३० गुंठ्यामध्ये त्यांना ४० क्विंटल बाजरीचे उत्पादन अपेक्षेत आहे.
अतिशय कमी पाण्यामध्ये हे बाजरीचे पीक येत असल्याचा त्यांचं म्हणणं आहे. साधारणपणे या बाजरीच्या एका झाडाला तब्बल अडीच ते तीन फुटाचे बाजरीची कणीस येतात.आपल्या कायमच्या बाजरी पिकापेक्षा या तुर्की बाजरीचे भरघोस उत्पन्न मिळते.त्यामुळे शेतकऱ्यांना या तुर्की बाजरी पासून नक्कीच फायदा मिळू शकतो असा विश्वास प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय गाजरे यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील देवकवठे गावचे प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय बाळकृष्ण गाजरे यांनी आपल्या शेतामध्ये राजस्थानहून आणलेल्या तुर्की जातीच्या बाजरी बियाण्याची लागवड केली केली आहे. pic.twitter.com/8Bw2cMIwxs
— Lokmat (@lokmat) September 13, 2023