साडेतीन एकर ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 06:04 PM2021-01-23T18:04:53+5:302021-01-23T18:05:44+5:30
अकोले तालुक्यातील इंदोरी शिवारात वीजवाहक तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत जवळपास साडेतीन एकर ऊस जाळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
अकोले : तालुक्यातील इंदोरी शिवारात वीजवाहक तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत जवळपास साडेतीन एकर ऊस जाळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
गावकरी व अगस्ती साखर कारखान्याच्या अग्निशमन बंब यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. भाऊसाहेब देशमुख, गणपत देशमुख यांचा ७० तर उज्ज्वला सुधाकर हासे यांचा ७३ गुंठे ऊस जाळून खाक झाला आहे.
या भागात दरवर्षी शॉर्टसर्किटमुळे ऊस जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात. वीज वितरणचे अधिकारी याकडे लक्ष देणार कधी? असा सवाल नुकसान ग्रस्त शेतकरी करत आहेत. वीज वितरणने लक्ष दिल्यास आंदोलन छेडू, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.