सोनई पतसंस्थेतील अपहार प्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 06:05 PM2018-04-17T18:05:03+5:302018-04-17T18:06:36+5:30
सोनई (ता. नेवासा) येथील व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील दोन कोटींच्या अपहारप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तिघा जणांना अटक केली आहे.
सोनई : सोनई (ता. नेवासा) येथील व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील दोन कोटींच्या अपहारप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तिघा जणांना अटक केली आहे.
अटकेमध्ये श्यामकुमार शंकर खामकर, गणेश हरिभाऊ गोरे व गणेश अंबादास तांदळे यांचा समावेश आहे. लेखापाल सोमाणी यांनी दोन महिन्यांपूर्वी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी या तिघांविरुध्द अपहाराचा गुन्हा दाखल केला.
मुदतीनंतर पैशाची मागणी करुनही ते न मिळाल्याने ठेवीदारांनी ठिय्या आंदोलन, उपोषण करुन वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला होता. ठेवीदारांचे पैसे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आरोपींना जामीन देऊ नये, अशी मागणी सुभाष लुणिया, अजित बडे यांनी केली आहे.