रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर तीन कलाकारांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:27 PM2018-05-24T13:27:30+5:302018-05-24T13:28:05+5:30
महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी नगरच्या प्रवीण तथा पी.डी. कुलकर्णी, अमित बैंचे व चैत्राली जावळे या तीन जणांची तीन वषार्साठी नियुक्ती झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांची अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली असून मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे.
अहमदनगर : महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी नगरच्या प्रवीण तथा पी.डी. कुलकर्णी, अमित बैंचे व चैत्राली जावळे या तीन जणांची तीन वषार्साठी नियुक्ती झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांची अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली असून मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे.
पी.डी. कुलकर्णी हे नगर मधील जेष्ठ रंगकर्मी असून गेली ४० वर्षाहून अधिक काळ हौशी रंगभूमीवर दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक, परीक्षक, संघटक म्हणून कार्यरत आहेत. संस्कार भारती, अहमदनगर शाखेचे अध्यक्ष असून विविध संघटनेच्या माध्यमातून त्यांचे कार्य सर्वांना परिचित आहे. अनेक स्पर्धांच्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातील त्यांचा पुढाकार सर्वश्रुत आहे. अमित बैचे हे लेखक असून त्यांनी आजवर अनेक नाटकांचे लेखन तसेच अनेक चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद लिहिलेले आहेत. दूरचित्रवाणी वर त्यांनी लिहिलेल्या अनेक मालिका गाजलेल्या आहेत. त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांचीही फेर नियुक्ती करण्यात आली आहे.
चैत्राली जावळे या देखील नाट्यक्षेत्रात अभिनेत्री म्हणून कार्यरत असून आर.जे. चैत्राली म्हणून सर्वांना ुपरिचित आहेत. संस्कार भारती, अहमदनगर शाखेच्या त्या उपाध्यक्ष असून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहमदनगरच्या कार्यकारिणी सदस्य आहेत.