जामखेड तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:52+5:302021-01-09T04:17:52+5:30
जामखेड : तालुक्यातील घोडेगाव, पाटोदा व खर्डा येथील प्रत्येकी एक अशा तिघांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. हे प्रकार ...
जामखेड : तालुक्यातील घोडेगाव, पाटोदा व खर्डा येथील प्रत्येकी एक अशा तिघांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. हे प्रकार शुक्रवारी उघड झाले. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमोल विश्वनाथ माेरे (वय २५, रा. पाटोदा, ता. जामखेड), दत्तात्रय दगडू अडसूळ (वय ५०, रा. घोडेगाव, ता. जामखेड), सचिन हरिश्चंद्र डुकरे (वय २३, रा. खर्डा, ता. जामखेड) अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत.
जामखेड शहरातील कर्जत रस्त्यावरील एका विहिरीत अमोल विश्वनाथ मोरे (वय २५, रा. पाटोदा) या तरुणाचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना शुक्रवारी सकाळी नागरिकांना आढळून आला. तालुक्यातील घोडेगाव येथे दत्तात्रय दगडू अडसूळ (वय ५० रा. घोडेगाव) याचाही मृतदेह विहिरीच्या पाण्यावर आढळून आला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत अशोक दत्तात्रय अडसूळ यांनी जामखेड पोलीस ठाण्यात खबर दिली.
तिसरी घटना खर्डा येथे घडली. सचिन हरिश्चंद्र डुकरे (वय २३, रा. खर्डा) याने दुपारी एकच्या सुमारास राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी रतिलाल रोहिदास डोके यांनी जामखेड पोलीस ठाण्यात खबर दिली.