घरफोडी करणारे तीन गुन्हेगार अहमदनगरमध्ये जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:10 PM2018-01-31T13:10:10+5:302018-01-31T13:16:11+5:30

नगर शहरासह राहाता व फलटण परिसरात घरफोडी करणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली.

Three criminals who burglar robbed in Ahmednagar | घरफोडी करणारे तीन गुन्हेगार अहमदनगरमध्ये जेरबंद

घरफोडी करणारे तीन गुन्हेगार अहमदनगरमध्ये जेरबंद

ठळक मुद्दे चोरटे सातारा आणि पुणे जिल्ह्यातीलतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर : नगर शहरासह राहाता व फलटण परिसरात घरफोडी करणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. महेश भीमा शिंदे (वय २५ ), रोहित प्रकाश लोंढे (वय २२ रा. सांगवी ता. फलटण, सातारा) व विकेन शिवा काळे (वय २४ रा. वरकुटे ता. इंदापूर) असे ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पोलीसांनी ताब्यात घेतलेले तिघे सातारा परिसर आणि नगरमध्ये येऊन घरफोडी करत होते. नगर परिसरात घरफोडी करून ते काही दिवस बाहेर जात होते. त्यामुळे ते पोलीसांना सापडत नव्हते. हे चोरटे एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख रूपयांचे विविध कंपनीचे एलईडी ताब्यात घेतले आहेत़. या तिघांवर राहाता पोलीस ठाण्यात पाच, लोणी, भिंगार, फलटण शहर ठाण्यात प्रत्येकी एक व फलटण ग्रामीण ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक कैलास देशमाने, डॉ़ शरद गोर्डे, राजकुमार हिंगोले, श्रीधर गुठ्ठे, सुधीर पाटील, कॉस्टेबल उमेश खेडकर, फकीर शेख, सोन्याबपू नानेकर, योगेश गोसावी, दिगंबर कारखेले, रविंद्र कर्डिले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Three criminals who burglar robbed in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.