नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 13:32 IST2019-04-30T13:28:07+5:302019-04-30T13:32:57+5:30
अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीहून प्रवास करणाऱ्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी अडीच वाजण्याच्या सुमारास नाशिक -पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात हा भीषण अपघात झाला.

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू
संगमनेर/घारगाव (जि. अहमदनगर) - अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीहून प्रवास करणाऱ्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (30 एप्रिल) अडीच वाजण्याच्या सुमारास नाशिक -पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात हा भीषण अपघात झाला. अपघातातमृत्यू झालेली तिघेही पुणे जिल्ह्यात मोठ्या वाहनांवर चालक म्हणून काम करत होते.
सय्यद शौकत सय्यद (वय 20, रा. हसनापूर, ता. राहाता. जि. अहमदनगर ), सुनील अंकुश खरात (वय 25, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जिल्हा. पुणे), किरण शिवाजी शिंदे (वय 25, रा. डिंबे, ता. आंबेगाव, जिल्हा. पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी ‘लोकमत’शी बोलताना याबाबत माहिती दिली. या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरातील कुटीर रूग्णालयात नेण्यात आले आहेत. पोलीस हेड कॉन्स्टेबल डी. एस. वायाळ व पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे तपास करत आहेत.