कोपरगाव तालुक्यातून तीन मुलींचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 17:00 IST2021-05-05T16:59:52+5:302021-05-05T17:00:17+5:30
याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पालकांच्या वेगवेगळ्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यातून तीन मुलींचे अपहरण
कोपरगाव : तालुक्यातील बोलकी, शहजापूर व शिरसगाव येथून मंगळवारी व बुधवारी या दोन दिवसात तीन अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पालकांच्या वेगवेगळ्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपहरणाच्या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
यामध्ये तालुक्यातील बोलकी शिवारातील १६ वर्ष ९ महिने वयाच्या मुलीचे मंगळवारी ( दि.४ ) दुपारी १ वाजेच्या सुमारास अपहरण झाले. तर दुसऱ्या घटनेत शहाजापूर येथील १४ वर्ष १० महिने वय असलेल्या मुलीचे बुधवारी ( दि.५) रात्री २ वाजेच्या सुमारास अपहरण झाले. तर तिसऱ्या घटनेत शिरसगाव येथील १६ वर्ष ६ महिने वय असलेल्या मुलीचे बुधवारी ( दि.५ ) सकाळी ६ वाजेच्या सुमारास अपहरण झाले आहे. दरम्यान तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या तीनही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का ? याबाबत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अमलदार तपास करीत आहेत.