कोपरगावात शुक्रवारी तीन बाधित रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:20 AM2021-01-23T04:20:40+5:302021-01-23T04:20:40+5:30
कोपरगाव : कोपरगावात शुक्रवारी रॅपिड अँटिजेन किटद्वारे दहा व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन व्यक्ती बाधित आढळल्या, तर आठ ...
कोपरगाव : कोपरगावात शुक्रवारी रॅपिड अँटिजेन किटद्वारे दहा व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन व्यक्ती बाधित आढळल्या, तर आठ व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. नगर येथील अहवालात एक अशा तीन व्यक्ती बाधित आढळल्या आहेत. ११ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. ११६ व्यक्तींच्या घशातील स्त्राव हे नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
२२ जानेवारीअखेर २,८४६ कोरोनाची लागण झाली. त्यात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सध्या १८ बाधित व्यक्तींवर उपचार सुरू आहे. उर्वरित २,७७९ बाधित व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील १९ हजार ८९० व्यक्तींची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४ हजार ६९४ व्यक्तींची नगर येथे स्त्राव पाठवून, तर १५ हजार १९६ व्यक्तींची रॅपिड अँटिजेन किटद्वारे तपासणी केली असल्याचेही डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले आहे.