नगरपालिकेचे तीन कर्मचारी निलंबित
By Admin | Published: May 15, 2014 10:45 PM2014-05-15T22:45:10+5:302023-10-27T17:25:32+5:30
संगमनेर : नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील महत्वाची फाईल गहाळ करून कामात हलगर्जीपणा करणार्या तीन कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले.
संगमनेर : नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील महत्वाची फाईल गहाळ करून कामात हलगर्जीपणा करणार्या तीन कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले. नगरपालिकेच्या अग्नीशामक विभागाच्या नूतनीकरणाचे काम सध्या चालू आहे. बांधकामाच्या ठेकेदाराने नूतणीकरणाच्या कामासंबंधी महत्वाची कागदपत्रे व बिले असलेली फाईल बांधकाम विभागाकडे दिली. पालिकेच्या आवक-जावक विभागात जमा झालेली फाईल बांधकाम विभागास दिली. परंतु सदरची फाईल अचानक गहाळ झाली. या कारणावरून आवक-जावक व बांधकाम विभागामध्ये वाद सुरू होता. कामात हलगर्जीपणा करून महत्वाची फाईल गहाळ केल्याचा ठपका ठेवून आवक-जावकचे शिपाई महेबूब पठाण, लिपिक सतीश डोळसे व गोरख निचळ यांच्या निलंबनाचे आदेश मुख्याधिकार्यांनी काढले. या करवाईमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी) बांधकाम विभागाची महत्वाची कागदपत्रे व बिलांची फाईल कर्तव्यात कसूर करून हलगर्जीपणाने गहाळ केल्यामुळे तीन कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले आहे. - श्रीनिवास पगडाल, प्रशासन अधिकारी