पुण्या-मुंबईहुन राशिन-भाळवणीत आलेल्यांना कोरोनाची लागण, आज जिल्ह्यात तीन नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:53 PM2020-06-18T12:53:19+5:302020-06-18T12:57:11+5:30

अहमदनगर- पुणे आणि मुंबई येथून आलेल्या भाळवणी (ता. पारनेर) आणि राशिन (ता. कर्जत) येथील रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील ३४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २६९ इतकी झाली आहे.

Three new patients in the district today contracted coronary heart disease from Pune-Mumbai | पुण्या-मुंबईहुन राशिन-भाळवणीत आलेल्यांना कोरोनाची लागण, आज जिल्ह्यात तीन नवे रुग्ण

पुण्या-मुंबईहुन राशिन-भाळवणीत आलेल्यांना कोरोनाची लागण, आज जिल्ह्यात तीन नवे रुग्ण

अहमदनगर- पुणे आणि मुंबई येथून आलेल्या भाळवणी (ता. पारनेर) आणि राशिन (ता. कर्जत) येथील रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील ३४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २६९ इतकी झाली आहे.
राशिन येथे पुणे येथून आलेल्या ६० वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली. कांदिवली-मुंबई येथून भाळवणी येथे आलेल्या ६८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील ३४ वर्षीय व्यक्तीला कोरोना आजाराची लक्षणे जाणवू लागली. त्यासाठी तो रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. यावेळी त्याची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आढळून आली.
---
एक रुग्ण घरी
जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण बरा होऊन आज घरी परतला. संगमनेर येथील रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज मिळाला. त्यामुळे घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता २२० इतकी झाली आहे.

Web Title: Three new patients in the district today contracted coronary heart disease from Pune-Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.