नगरच्या माळीवाड्यातील तिघे सुखरुप घरी, जिल्ह्यातील ०६ रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:12 PM2020-06-11T12:12:48+5:302020-06-11T12:12:58+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील आणखी सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत मात केलेल्यांची संख्या १६७ वर पोहोचली आहे. यामध्ये सध्या कन्टेंटमेंट झोनमधील तिघे जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
अहमदनगर : जिल्ह्यातील आणखी सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत मात केलेल्यांची संख्या १६७ वर पोहोचली आहे. यामध्ये सध्या कन्टेंटमेंट झोनमधील तिघे जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळीच एक आनंदाची बातमी धडकली. बुधवारी तब्बल २० जण कोरोनामुक्त झाल्याने नागरिक आणि प्रशासनाच्या प्रयत्नाला चांगले फळ मिळाले. गुरुवारी पुन्हा सहा जण कोरोनामुक्त झाले. सहापैकी ०५ व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. एका व्यक्तीला कोपरगाव येथून डिस्चार्ज मिळाला. यामध्ये नगर महापालिका क्षेत्रातील ब्राह्मण गल्ली (माळीवाडा) येथील ०३, श्रीरामपूर ०१ आणि संगमनेर येथील एक अशा पाच व्यक्तींना बूथ हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. येथील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांनी या रुग्णांना निरोप देत पुढील चांगल्या आरोग्यासठी सदिच्छा दिल्या. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १६७ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
बरे होण्याचे प्रमाण आता वाढत आहे. बाधित व्यक्तींपेक्षा बरे होणाºयांची संख्या वाढत असल्याने प्रशासनानेही निश्वास टाकला आहे. माळीवाड्यातील कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यातही प्रशासन यशस्वी ठरले आहे.