कोतूळचा तीन हजार गोणी कांदा दुबईला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:00 AM2020-04-17T11:00:01+5:302020-04-17T11:01:08+5:30
दुहेरी संकटात शेतकरी असताना दिलासा देणारी बाब म्हणजे कांदा परदेशात निर्यात होत आहे. कोतूळ (ता. अकोले) येथील तीन हजार गोणी कांदा बुधवारी (१५ एप्रिल) दुबईत विक्रीसाठी रवाना केला.
कोतूळ : देशात सगळीकडे लॉकडाऊनने मजूर, ग्राहक या अडचणीला सामोरे जात असताना त्यात कांद्याचे भाव कोसळले आहेत. या दुहेरी संकटात शेतकरी असताना दिलासा देणारी बाब म्हणजे कांदा परदेशात निर्यात होत आहे. कोतूळ (ता. अकोले) येथील तीन हजार गोणी कांदा बुधवारी (१५ एप्रिल) दुबईत विक्रीसाठी रवाना केला.
कोतूळ येथील शेतकरी दत्तात्रय रामदास देशमुख यांच्या शेतातील हा कांदा आहे. कोतूळ येथील निर्यात परवानाधारक व्यापारी नितीन भिमराज देशमुख यांच्यामार्फत नुरसन इंटरनॅशनल एक्सपोर्ट कंपनी (मुंबई) या दुबईतील व्यापार करणाºया कंपनीने हा कांदा खरेदी केला आहे.
सध्या हा कांदा वीस किलोच्या जाळीदार पिशवीत भरला गेला आहे. दोन कंटेनरमधून तीन हजार गोणी कांदा निर्यात होणार आहे. कांदा उत्पादक शेतकºयांना निर्यातीतून दोन पैसे जास्त मिळतील हे नक्की.
सध्या लॉकडाऊनमुळे कांदा इतर राज्यात जात नाही. मार्च, एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात कांदा विक्री होते. मात्र यंदा कांदा शेतात पडून आहे. त्यात भाव पडलेले आहेत. परदेशात निर्यात झाली तरच भाव वाढतील. दुबईत विक्री कशी होते यावर भाव ठरेल, असे कांदा व्यापारी नितीन भिमराज देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.