नगरमध्ये पेट्रोलपंपांना आता ‘टाईम लिमीट’; रस्त्यावर वाहनांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 02:14 PM2020-03-24T14:14:19+5:302020-03-24T14:15:49+5:30

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवारी (दि.२४ मार्च) सकाळी नऊ नंतर जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप बंद झाल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या घटलेली दिसली. 

Time limit for petrol pumps in city The number of vehicles on the road decreased | नगरमध्ये पेट्रोलपंपांना आता ‘टाईम लिमीट’; रस्त्यावर वाहनांची संख्या घटली

नगरमध्ये पेट्रोलपंपांना आता ‘टाईम लिमीट’; रस्त्यावर वाहनांची संख्या घटली

अहमदनगर : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवारी (दि.२४ मार्च) सकाळी नऊ नंतर जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप बंद झाल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या घटलेली दिसली. 
नऊ वाजेपर्यंत किती पेट्रोल व डिझेल विकले गेले? याचे रिडींग पेट्रोल पंपचालकांनी प्रशासनाला पाठविले आहे. त्यानंतर दुस-या दिवशी सकाळी पाचपर्यंत पेट्रोल अथवा डिझेलचे वितरण करण्यात येणार नाही. नऊ नंतर अनेक वाहनचालक पेट्रोल पंपावर येऊन पाठीमागे गेले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेल विक्रीही ते २४ ते ३१ मार्च  या कालावधीत दररोज सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहील, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.

Web Title: Time limit for petrol pumps in city The number of vehicles on the road decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.