अध्यात्मिक/काळाने ग्रासिले सावधान व्हारे .... अशोकानंद महाराज कर्डिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 06:42 PM2020-08-13T18:42:33+5:302020-08-13T18:44:51+5:30

धन संपत्ती, जनसंपर्क , तारुण्य  याचा गर्व करू नको. काळ निमिषार्धात सर्व हरण करू शकतो. हे सर्व मायामय म्हणजेच मिथ्या आहे असे समजून घे व ब्रह्मस्वरुपात प्रवेश कर. 

Time will tell | अध्यात्मिक/काळाने ग्रासिले सावधान व्हारे .... अशोकानंद महाराज कर्डिले

अध्यात्मिक/काळाने ग्रासिले सावधान व्हारे .... अशोकानंद महाराज कर्डिले

----------------------
 

भज गोविंदम-||१३||

      मा कुरु धनजनयौवनगर्वं, हरति निमेषात्काल सर्वं ||

     मायामयमिदमखिलम बुद्ध्वा ब्रह्मपदंदंत्व प्रविश विदित्वा ||१३||

 

धन संपत्ती, जनसंपर्क , तारुण्य  याचा गर्व करू नको. काळ निमिषार्धात सर्व हरण करू शकतो. हे सर्व मायामय म्हणजेच मिथ्या आहे असे समजून घे व ब्रह्मस्वरुपात प्रवेश कर. 
--------------------------------
धन द्रव्य संपत्ती मालमत्ता टिकणारे नाही धनाच्या मागे १५ अनर्थ आहेत. अर्थस्य पुरुषो दास:, दास तू अर्थो न कस्यचित  इति मत्वा महाराज, बुद्ध अस्मि अर्धेन कौरवै: महा•ाारत आचार्य •ाीष्म युधीष्ठीराला म्हणतात राजन अर्थ कोणाचाही दास नाही सर्व अथार्चे (पैशाचे) दास आहेत. आता हेच पहा ना कौरवांना या धनाच्या गवार्नेच अहंकारी बनवले आहे व माझी सुद्धा बुद्धी मलीन झाली याला कारण अर्थच आहे. धन दारा पुत्र जन े बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून  शरण रिघा देवासी,  संत नामदेव महाराजही सांगतात की हे धन, पत्नी, पुत्र व जन म्हणजे बंधू नातेवाईक कोणीही कामाला येत नाही, प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. म्हणून सर्वांचे ममत्व सोडणे हितकारक आहे.  लोक वासना काही कामाची नाही. आपले तारुण्यसुद्धा चिरकला टिकणारे नाही. कधी वृद्धापकाळ येईल सांगता येत नाही. म्हणून या सर्व गोष्टीचा गर्व करू नको. 


काळाने ग्रासिले सावधान व्हारे,सोडवण करारे हरिनाम, 
आयुष्य सरलिया कोण पा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड, 
उपाय तो सोपा नामाचा, गजर न करी विचार पुढे काही 
एका जनार्दनी तू का रे आंधळा, देखातोसी सुख दु:खे 


शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महारज जगातील अंतिम सत्य सांगतात की हे जीवा काळाने सर्वांना ग्रासिले आहे कोणीही या काळाच्या तावडीतून सुटू शकत नाही. म्हणून तुम्ही हरीनाम घ्या आणि सोडवण करा. आयुष्य संपल्यावर कोणही वाचवू शकत नाही. आता तुम्हीच बघा ना कोरोना व्हायरस •ायानक आजार जग•ार पसरला आहे. तर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बरे करोनाजवळ कोणताही •ोद नाही तो गरीब श्रीमंत काही पहात नाही. काळ श्रेष्ठ आहे. मृत्युच्या •ाीतीने लोक घराबाहेर निघायला सुद्धा घाबरतात. म्हणून नाथ बाबा सांगतात की तुम्ही सावधान व्हा हरीनाम घ्या व सोडवण करा. आयुष्य जर संपले तर कोणीहि वाचवू शकत नाही. हरीनाम हा सोपा उपाय आहे. त्यामुळे काहीही विचार न करता नामस्मरण करा मग प्रारब्धात असेल तसे होईल. नाथबाबा म्हणतात, तुला हे सर्व समजत असून तू का आंधळा होतोस ?आणि सुख दु:ख बघातोस ..
   श्रीमद आचार्य स्वामी आद्य शंकराचार्य महाराज म्हणतात, धन नष्ट होणारे आहे. याला आश्रय नाश , परत: नाश, स्वत: नाश असे तीन प्रकारचे नाश आहेत. हे फक्त व्यावहारिक सत्तेतच •ाासणारे आहेत. म्हणून याचा विश्वास धरू नये.  जीवाने प्रयत्नपूर्वक ब्रह्मस्तिथी प्राप्त करून घ्यावी व तोच अनु•ाव घेऊन त्या ब्रह्मस्थितीत प्रवेश कर. मनुष्य जीवनाचे अंतिम गन्तव्य स्थान हेच आहे.  

अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल •ाागाताश्रम , चिचोंडी (पाटील) ता. नगर
मोबा. ९४२२२२०६०३
 

Web Title: Time will tell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.