तिसगाव योजनेत कौडगावसहचार गावांचा समावेश करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:22 AM2021-08-29T04:22:00+5:302021-08-29T04:22:00+5:30
पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागातील पिके तर ...
पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागातील पिके तर गेलीच आहेत, पण अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने विहिरींची पाण्याची पातळी खोल गेल्याने जोहारवाडी, कौडगाव, त्रिभुवनवाडी, निंबोडीसह अनेक गावावर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे आहे. या गावांच्या परिसरात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने मुळा धरणातून या भागातील २७ गावांना पिण्याचे पाणीपुरवठा करणारी मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा करणारी योजना दुष्काळी भागातील या गावांची तहान भागवीत आहे. या प्रादेशिक पाणी योजनेत जोहारवाडी, कौडगाव, त्रिभुवनवाडी, निंबोडी या गावांचा समावेश केल्यास या गावांची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल, अशी मागणी शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुख व कौडगाव-त्रिभुवनवाडी-निंबोडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हस्के यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी केली आहे.
---------
ऐन पावसाळ्यात अपुऱ्या पावसामुळे या गावातील विहिरींची पाणीपातळी खोल गेली आहे. प्रादेशिक पाणी योजनेत या गावांचा समावेश केल्यास भविष्यात येणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करता येईल.
- राजेंद्र म्हस्के, शिवसेना, तालुका संपर्क प्रमुख