तंबाखूचा कंटेनर लुटणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:09 AM2017-10-16T11:09:43+5:302017-10-16T11:12:16+5:30

कंटेनरसहित एकूण ३५ लाख ६ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ दरम्यान, आरोपींनी चोरलेला कंटेनर व तंबाखूचा मुद्देमाल मनमाड दहेगाव येथे बेवारस सोडून दिलेला होता.

Tobacco containers robbery gang | तंबाखूचा कंटेनर लुटणारी टोळी जेरबंद

तंबाखूचा कंटेनर लुटणारी टोळी जेरबंद

अहमदनगर : नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव शिवारात तंबाखुने भरलेला कंटेनर लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने पकडली. चार जणांना अटक करण्यात आली असून, ६ ते ८ जण फरार आहेत.
अटक केलेल्यांमध्ये विशाल गुलाब वाघ (रा. बुधलवाडी, ता. नांदगाव, जि. नाशिक), दीपक रामदास परदेशी (रा. कुमावतनगर, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक), ज्योतीराम जर्नाधन पाटील, आशा नानासाहेब निकम (दोघे रा. पडसाली, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे. त्यांचे साथीदार शुभम दीपक बच्छाव (रा. माधवनगर, संकलेचा शोरुममागे, मनमाड, जि. नाशिक), अनिल रामदास अहिरे (रा. गावडे निवास चाळ, महालक्ष्मीनगर, बुद्ध विहाराजवळ, अंबरनाथ पूर्व), आकाश दिगंबर फंड (रा. केमवाडी, सावरगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), माणिकराव सगळे (पूर्ण नाव माहित नाही, रा. बुधलवाडी, मनमाड, जि. नाशिक) व इतर २ ते ४ व्यक्तींच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता रामभरोसे विजयसिंग चौहान (वय 38, रा. सतलापूर मंडीदीप, ता. गोहरगंज, जि. रायसेन, मध्यप्रदेश) यांनी त्यांच्या ताब्यातील कंटेनर नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव शिवारातील हॉटेल उत्सवजवळ थांबविला होता. ते मोबाईलवरून त्यांच्या मित्रासमवेत बोलत होते. त्यावेळी क्वॉलिस गाडीतून ४ जण आले. त्यांनी कंटेनरसहित एकूण ३५ लाख ६ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ दरम्यान, आरोपींनी चोरलेला कंटेनर व तंबाखूचा मुद्देमाल मनमाड दहेगाव येथे बेवारस सोडून दिलेला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या आदेशावरून पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील, कर्मचारी भाऊसाहेब काळे, दत्ता हिंगडे, उमेश खेडकर, फकीर शेख, विजय वेठेकर, दत्ता जपे, रावसाहेब हुसळे, दिलीप शिंदे, रवी सोनटक्के, संदीप पवार, सचिन कोळेकर, बबन बेरड आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली़

Web Title: Tobacco containers robbery gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.