आज तब्बल ७१९ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; आज १६३ बाधितांची रुग्णसंख्येत भर, सहा जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:36 PM2020-09-13T12:36:16+5:302020-09-13T12:39:47+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात आज तब्बल ७१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार १५६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.६७ टक्के इतके झाले आहे.
अहमदनगर : जिल्ह्यात आज तब्बल ७१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार १५६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५५४ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, संगमनेर ०१, राहाता ०२, पाथर्डी ०५, नगर ग्रामीण २९, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा २०, श्रीगोंदा ११, पारनेर १४, शेवगाव २४, कोपरगाव २५ आणि जामखेड ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ७१९ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा ३०९, संगमनेर ०६, राहाता ३२, पाथर्डी १३, नगर ग्रा.५७, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट ०७, नेवासा ०६, श्रीगोंदा २२, पारनेर ३४, अकोले ०४, राहुरी ३३, शेवगाव ७३, कोपरगाव ४३, जामखेड २१, कर्जत २४ आणि मिलिटरी हॉस्पिटल ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
----
*बरे झालेली रुग्ण संख्या: २६१५६*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३५५४*
*मृत्यू:४६८*
*एकूण रूग्ण संख्या:३०१७८*