कोरोना योद्धयांचाही आज विजय दिवस....तबब्ल ४६५ जणांनी मिळविला कोरोनावर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 11:54 AM2020-07-26T11:54:33+5:302020-07-26T11:55:01+5:30
अहमदनगर : कारगिलच्या लढाईचा विजयी दिवस साजरा होत असताना नगरमध्ये कोरोना योद्धयांनीही कोरोनावर विजय मिळविला आहे. जिल्ह्यातील ४६५ जणांना बरे झाल्याने रविवारी सकाळी घरी सोडण्यात आले.
ref='https://www.lokmat.com/topics/ahmednagar/'>अहमदनगर : कारगिलच्या लढाईचा विजयी दिवस साजरा होत असताना नगरमध्ये कोरोना योद्धयांनीही कोरोनावर विजय मिळविला आहे. जिल्ह्यातील ४६५ जणांना बरे झाल्याने रविवारी सकाळी घरी सोडण्यात आले. नगर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे बरे होणाºया रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे दिसते. रविवारी सकाळी जिल्ह्यातील ४६५ जणांना घरी सोडण्यात आले. यामध्ये नगर शहरातील २७९ जणांना घरी सोडण्यात आले. संगमनेरमधील ३३, राहाता येथील २९, पाथर्डी येथील ४, नगर तालुक्यातील १५, श्रीरामपूरमधील २४, कन्टोनमेंटमधील ३, नेवासा येथील १५, श्रीगोंदा येथील १७, पारनेर येथील १२, अकोले येथील ६, शेवगाव येथील ८, कोपरगाव येथील ३, जामखेड येथील १, कर्जत येथील ५ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १९४५ इतकी झाली आहे.---------आता सात दिवस क्वारंटाईनबरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येत असले तरी त्यांना किमान दहा दिवस घरातच क्वारंटाईन रहायचे आहे. ताप व इतर लक्षणे नसल्याने सात दिवसानंतर रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र पुढील दहा दिवस त्यांना घरी रहायचे आहे. जेणेकरून रुग्ण व इतरही सुरक्षित राहतील. याबाबतचा नवा आदेश शनिवारी जारी करण्यात आला होता.