आज जिल्ह्यात नगर सहा नवीन रुग्ण. तर ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 01:32 PM2020-06-04T13:32:51+5:302020-06-04T13:33:03+5:30
अहमदनगर- गुरुवारी जिल्हत कोरोनाचे सहा नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटिष्ट्वह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता १८३ एवढी झाली आहे.
अहमदनगर- गुरुवारी जिल्हत कोरोनाचे सहा नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटिष्ट्वह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता १८३ एवढी झाली आहे.
शेवगाव तालुक्यातील रानेगाव येथील ३२ वर्षीय युवक बाधित झाला आहे. यापूर्वी बाधित आढळलेल्या येथील व्यक्तीसोबत हा युवक मुंबईस जाऊन आला होता. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील १० वर्षीय मुलगाही बाधित तर लालबाग येथून घुलेवाडी (पारनेर) येथे आलेली २८ वर्षीय महिला बाधित झाली आहे. संगमनेर शहरातील दोघांना कोरोनाची लागण. कोल्हेवाडी रोड येथील १८ वर्षीय युवक बाधित तर नवघरगल्ली येथील ३२ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे.
अहमदनगर शहरातील लालनगर, नेप्तीनाका केडगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण् झाली आहे. जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. यात, नगर तालुका, नगर शहर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, राहूरी आणि पारनेर येथील हे रुग्ण आहेत. सर्व कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे बाहेरील जिल्हयातून अहमदनगर जिल्ह्यात आले होते. आतापर्यंत कोरोनामुक्त होऊ