आजपासून मुळातून रब्बीचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:38 PM2018-11-21T13:38:15+5:302018-11-21T13:42:30+5:30

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यतून आवर्तन सोडण्याला मुहूर्त मिळाला आहे.

From today the rabbi recurrence of root | आजपासून मुळातून रब्बीचे आवर्तन

आजपासून मुळातून रब्बीचे आवर्तन

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यतून आवर्तन सोडण्याला मुहूर्त मिळाला आहे. मुंबईत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री विजय शिवथरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत  आज सकाळी ६ वाजता उजव्या कालव्यातून रब्बीसाठी आवर्तन सोडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धरणात उजव्या कालव्यासाठी ५५०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. दरम्यान, बैठकीला आमदार शिवाजी कर्डिले व अशासकीय ६ सदस्य गैरहजर होते. 
कालवा पाणी वाटप सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत मुळा धरणाच्या पाण्याचा आढावा घेण्यात आला.  २६००० दलघफू पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात उपयुक्त पाणीसाठा ११००० दलघफू उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. उजव्या कालव्याखाली रब्बीचे २५००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे़ मुळा उजव्या कालव्याचे एकच आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे यावेळी जलसंपदा मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले़ मुळा उजवा कालवा सल्लागार समितीच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे, सदस्य शिवाजी भिसे, सुभाष साठे, बापूसाहेब पाटेकर हे उपस्थित होते़ आमदार शिवाजी कर्डिले बैठकीला अनुपस्थित होते़ पाणी वापर संस्थेचे ९ सदस्य आहेत.मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीत ६ अशासकीय सदस्यांनी दांडी मारली़ जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, उपअभियंता ए़ बी़ खेडकर, धरण अभियंता अण्णासाहेब आंधळे आदी उपस्थित होते.

Web Title: From today the rabbi recurrence of root

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.